Tuesday, January 19, 2010
गोल्डनबॉय बिंद्राने खेळ सोडून द्यावा
धनराज पिल्ले सारखा गुणी खेळाडू ज्याला ध्यानचंद नंतरचा तारा समजले जायचे, त्याला पण हॉकी च्या पदाधिकार्यांच्या गलिच्छ राजकारणाने सडवले आणि निवृत्त होण्यास भाग पाडले....
बिंद्राच्या बाबतीत जे झाले त्यासाठी लालफितीचे तानाशाही अधिकारी जास्त जबाबदार आहेत. अनुशासन कोणाला शिकवतात हे? जिथे सरकारला कोणतेही अनुशासन नाही. मनमानी कारभार करते तिथे क्रिडा क्षेत्रात ही घाण पसरली तर नवल ते कसले? पाणी नेहमी वरुन खाली वाहते...
ऑलंपिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूशी असे वर्तन करणार्या या भ्रष्ट पदाधिकार्यांनी स्वत: नेमबाजीसाठी कधी बंदूक हातात धरली असेन का? फक्त आणि फक्त पैसा खाणे हेच ज्यांना माहित आहे त्यांनी साधी या गोष्टीची पण सोय केली नाही की खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. कशाला आपले खेळाडू परदेशी जातील मग? इथे सुविधा देण्याच्या नावाने बोंब आणि मग परदेशी खेळाडू स्वतःच्या खर्चाने गेले तरी पोटात दुखते यांच्या...
हॉकीची टीम पण म्हणाली होती की आम्ही आमच्या पैशाने वर्ल्ड कप खेळू. यातच क्रिडा क्षेत्राच्या भ्रष्ट्राचाराचा बुडबुडा फुटतो. पण सरकारी मंत्रीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान देखील मांजरासारखे डोळे बंद करुन बसतात. मुळात दर्जा निर्माण करण्याबद्दल शासकीय यंत्रणाच झोपलेली आहे तर खेळाडूंनी किंवा सर्वसामान्यांनीही काय करावे?
सर्व खेळाडूंना मोलाचा सल्ला : हा देश दर्जेदार खेळाडूंसाठी नाहिये. फक्त वशिला आणि मोठ्या नेत्याचा पाठींबा असणार्या खेळाडूंसाठीच आहे. तेव्हा खेळ सोडा आणि आपले पोटापाण्याचे उद्योग बघा ... किंवा पैसे असतील तर विदेशात जा. तिथे तुमची कदर होईन....
(क्रिडा क्षेत्राच्या नासाडीने खिन्न झालेला) सागर
Thursday, January 7, 2010
नवीन वर्ष २०१०
नवीन वर्षाची सुरुवात ही खरेतर सर्व जण नवीन संकल्प करण्यासाठी वापरतात.
मी पण काहीतरी ठरवले आहे. भरपूर लेखन करायचे हा त्यातील एक संकल्प.
जनसामान्यांचे विचार या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
*** सध्यातरी २०१० या नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा ***
जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!
- सागर
Thursday, October 8, 2009
महाराष्ट्राचे भवितव्य : १३ ऑक्टॉबर २००९ : विधानसभा निवडणूक
येत्या १३ ऑक्टोबर २००९ ला महाराष्ट्राचे भवितव्य मतपेटीत बंद होईन. पण त्या अगोदर आपले मत योग्य पक्षाला दिले जाते आहे की नाही हे बघणे प्रत्येक जागरुक मतदाराचे पहिले कर्तव्य आहे. आजची तरुण , मध्यमवयीन आणि वृद्ध पीढी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा वा स्वत:ची कामे करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात मग्न राहतात. आपण मतदानाच्या दिवशी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारायला हवा. आपण स्वत: खूप गंभीर होणे खूप आवश्यक आहे. सर्व जगात लोकशाही प्रभावीपणे टिकवणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. लोकशाही पद्धतीने मतदान होते हे खरे आहे. पण योग्य उमेदवार लोक निवडून देतात का? हा खरा चिंतेचा विषय आहे.
मत देऊ शकणार्या प्रत्येकाने मत देण्यापूर्वी आपल्याला अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या जगण्यासाटी आवश्यक मूलभूत गरजा स्रहजपणे उपलब्ध आहेत का? जर ह्या मूलभूत गरजांसाठी चैन म्हणून झगडावे लागत असेन तर स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तीची अवस्था अशी का? हा खरेच खूप मोठा गंभीर प्रश्न आहे.
आता उदाहरणच द्यायचे झाले तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात २-३ वर्षांपूर्वी असणारे जमीन आणि फ़्लॅट्स चे भाव आकाशाला जाऊन भिडले आहेत. आर्थिक मंदी आली तेव्हा ह्या मुजोर बिल्डर लॉबीने जेवढ्या तेजीने भाव वाढवले तसे खाली न आणता स्थिर ठेवून पुन्हा वाढवत आहेत. ह्या सर्व भांडवलदारांवर कोणीतरी अंकुश ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत हे काम फ़क्त राज ठाकरे प्रभावीपणे करताना दिसत आहेत. सत्तेत असणा~र्या व विरोधी पक्षात असणार्र्या प्रमुख पक्षांनी हे काम करणे हे त्यांचे कर्तव्य होते. पण कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. मराठी माणसाला सगळे गृहीत धरतात आणि मराठी माणूस हे पहात बसण्यशिवाय काही करु शकत नाही.
सध्याच्या परिस्थितीत मला तरी राज ठाकरे यांना संधी देण्याचा योग्य पर्याय दिसत आहे. असे का? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. आपण काही कारणे पाहूया मग तुम्ही स्वत: ठरवा योग्य नि अयोग्य...
राज ठाकरेंना पाठींबा देण्याची गरज आहे असे मला तरी वाटते आहे. यातून दोन संध्या मला तरी दिसत आहेत.
अ. राज ठाकरेंना संधी दिली तर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना काम करुन दाखवावे लागेल - आणि
ब. कॉंग्रेस , राष्ट्रवादी, सेना , भाजपा व इतर पक्षांना लोकांसाठी खर्र्या अर्थाने कामे करावी लागतील
म्हणजे झाला तर मराठी माणसाचाच फ़ायदा आहे. आणि अशी सुवर्णसंधी मराठी माणसाने गमावू नये असे मला वाटते. आणि मनसे नावाच्या वादळाने कामे नाही केली तर ५ वर्षांनी काय करायचे ते तुमच्या मतदार राजाच्याच हातात आहे की. ६० वर्षांच्या मानहानीच्या तुलनेत ५ वर्षे अपेक्षांची काय वाईट?
१. मला संधी द्या ... आधी जे कधी घडले नव्हते ते घडवून दाखवीन. आणि यात अपेशी ठरलो तर पुन्हा तुमच्या दारात मत मागायला येणार नाही. - असे आजपर्यंत गेल्या ६०-६२ वर्षांत एक तरी नेता म्हणाला होता का हो?
२. नितिन गडकरीं हे विरोधी पक्षातील असूनही त्यांना रिझल्ट देणारा माणूस म्हणून त्यांच्या कामांची उदाहरणे देऊन कौतुक करणे हे आजपर्यंत कोणा राजकीय नेत्याने केले होत का हो?
३. जेट ऐअरवेज... करण जोहर चा चित्रपट... मराठी पाट्या .... रेल्वेत फ़क्त उत्तरभारतीयांच्या भरतीच्या विरोधातील आंदोलने... हे राज ठाकरे यांनी दिलेले रिझल्ट्स आहेत. सरकार सत्तेवर असून या प्रश्नांना न्याय देऊ शकले नव्हते.
तेच काम राज ठाकरे यांनी सत्तेत नसताना करुन दाखवले हे विशेष. राज ठाकरेंना सत्तेची चावी हातात दिली तर कामे किती प्रभावी पद्धतीने होतील?
मराठी माणसाने आता स्वत:बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे . आपण दुसर्र्या राज्यांमधे जातो तेव्हा हिंदी चालते का? आपल्या शेजारचीच राज्ये घ्या ना... गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ...
आपले बहुमोल मत देण्यापूर्वी मराठी माणसांपुढे उभे असणारे प्रश्न विचारात घेऊन मतदान करावे अशी माझी विनंती आहे.
१. घराचे स्वप्न साकार होते आहे का?
२. सकस अन्न पोटभर मिळते का? (रेशनच्या निकृष्ट दर्जाच्या तांदूळावर-धान्यावर मराठी माणसाने जगायचे का?)
३. मराठी मुला-मुलींना रोजगाराच्या संधी सहजपणे मिळतात का?
४. दुकानात खरेदीसाठी जातात तेव्हा मराठी ग्राहक म्हणून आदर मिळतो का?
५. उद्योगधंदे करण्याबाबत मराठी तरुणांना सरकारी प्रोत्साहन प्रत्यक्ष मिळते का?
६. मराठी संस्कृती, मराठी भाषा यांचा सन्मान आपल्याच महाराष्ट्रात होतो का?
विचार करा आणि मत द्या
जय महाराष्ट्र
सागर
Thursday, August 20, 2009
जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले?
पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा आणि जसवंतसिंह यांच्या मित्रवर्यांमध्ये हे पुस्तक अगोदरच वितरित झालेले होते. तसे बहुतेक सर्व पुस्तकांच्या बाबतीत होत असते ....अभिप्रायासाठी... आडवाणी हे देखील पट्टीचे वाचक असल्यामुळे त्यांनी पुस्तक वाचले असेनच आणि त्यांची जसवंतसिंहांना बरखास्त करण्या मागे निर्णायक भूमिका असल्याचे तर्क हिंदी पत्रकार व्यक्त करत आहेत. (मी बंगळूरात राजस्थान पत्रिका वाचतो. त्यात आजच्याच अंकात यावर लेख आला आहे.)
खरेखोटे देवच जाणे..
पण जसवंतसिंहांच्या पुस्तकामुळे 'जीनांमुळे' पाकीस्तानची निर्मिती झाली हे सत्य खोटे ठरु शकत नाही. भारताच्या फाळणीचा सखोल अभ्यास करुन विदेशी लेखकांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकातही हेच सांगितले गेले आहे. या पुस्तकावर तर पाकीस्तानात बंदी आहे. त्यात जीनांविषयी अनेक सत्य बाबी लिहिलेल्या आहेत. जीज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे.
माझे स्वत:चे मत विचाराल तर गांधीजींच्या अहिंसेमुळे आपल्या भारत देशाची जेवढी हिंसा झाली आहे तेवढी जगाच्या इतिहासात कोठेही झालेली नाही. हिंसक अन्यायाविरुद्ध हिंसक प्रतिकार हेच एकमेव शस्त्र ठरते. जगाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर सगळीकडे एकच चित्र दिसते की हिंसक अत्याचाराला हिंसेनेच प्रत्युत्तर दिले तरच अन्यायाविरुद्ध जिंकता येते. ग्यारिबाल्डीने काय केले? ... जोसेफ़ मॆझिनि ने काय केले? .... स्वातंत्र्याचा लढा हिंसेनेच लढले ना?
हिटलर... नेपोलियन या हुकुमशहांना सत्ता कशी मिळाली? हिंसेच्या माध्यमातूनच ना? ... हिटलर ला नेस्तनाबूत कसे केले गेले? ... युद्धानेच ना?...
जो पर्यंत समस्त भारतवासी गांधीजींच्या किडलेल्या आणि सडलेल्या तत्त्वांना घट्ट जळवासारखे पकडून बसलेल्या कॊंग्रेसचे आंधळे अनुकरण करतील तर येत्या काही दशकांत भारत या नावाचा देश आणि हिंदू नावाचा महान धर्म नष्ट झालेला असेन.
जाज्ज्वल्य देशभक्ती जागवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे खूप आवश्यक आहे समस्त भारतवासियांनो.... एकदाच किंमत मोजावी लागेल पण आपल्या पुढच्या १००० पिढ्या सुखाने जगतील... तेव्हा नष्ट होऊन इतिहासाचे जीर्ण पान व्हायचे का इतिहास हादरवून सोडायचा ते तुमचे तुम्ही ठरवा.. जय हिंद
विषयांतर होतंय... मुद्याकडे परत वळतो... तर जसवंतसिंहांना मिळालेली शि़क्षा ही योग्य आहे असे माझे मत आहे.
अशा सडक्या मनोवृत्तींना त्यांची जागा दाखवून देणे खूप आवश्यक आहे. भाजपाने जसवंतसिंहांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे.
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
(पूर्वीच्याच अखंड भारताचे स्वप्न पाहणारा) सागर
Thursday, May 7, 2009
अजून किती सहन करणार काँग्रेसला?
गरिबांचे आशिर्वाद तरी मिळवले होते त्यांनी
जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवले होते भाजपाच्या सरकारने.
त्यासाठी काय काय उठाठेवी केल्या ते त्यांचे त्यांना माहीत...
पण गरिबांना ५ वर्षे एकाच दराने स्वस्त अन्न धान्य उपलब्ध करुन दिले होते...
गरिबांच्या पोटाचा विचार किमान या सरकार ने केला तरी होता...
काँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे
वीज
पाणी
पेट्रोल
२०-२२ रुपयाला मिळणारा तांदूळ ४०-६० रुपयांना मिळतोय
डाळींचेही तेच
साखर
दूध
गहू
बाजरी
सर्व्हिस टॅक्स वाढवला
व्हॅट सुरु केला
सगळ्यां जीवनावश्यक वस्तूंचे भाव तुम्ही पहा.
तुमचे तुम्हालाच कळेल सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागते आहे ते....
गरिबीरेषेखाली जगणारे व मध्यमवर्गीय या वर्गात मोडणारे जे आहेत ते सर्व देशाच्या बहुसंख्य लोकांमधे येतात. ९०% पेक्षा जास्त
तुम्हीच बोला ... सर्वसामान्य माणसाने काय करावे?
सामान्य माणसांना अणुकरार.... विदेश दौरे या गोष्टी नाही कळत हो.... त्याला फक्त पोटाला बसणारा चिमटा कळतो....
मन मारणे कळते....
काँग्रेसने इमानेइतबारे सर्वसामान्यांसाठी काम करायचे ठरवले असते तर खरेच ५-१० वर्षे पुरेशी आहेत देशाचा कायापालट करायला.
पण सर्वात जास्त स्विस बँकेत बॅलन्स फुगवण्यात काँग्रेसी नेते आघाडीवर आहेत हे सत्य नाकारता येणार नाही... यामुळेच तर सध्याचे सरकार काळया पैशावर मौन साधून आहे आणि कोणतीही कार्यवाही करत नाहीये. चोरच कसा सांगेन ही आपली चोरी आहे म्हणून :)
आडवाणींनी राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित केला असे मान्य केले तरी सत्य नाकारता येत नाही....
अरे लेको आपल्याच कष्टाचे पैसे विदेशात पडले आहेत आणि आपण त्याच चोरांना योग्य उमेदवार म्हणून निवडून देतो याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे....
एकालाच संधी किती वर्षे देणार? झाली की ५० वर्षे... दुसर्या पक्षांना संधी नाही मिळाली तर त्यांना अनुभव कधी येणार?
आपण सर्व मतदार लाचारीने एकच पर्याय कायम निवडत आलेलो आहोत... दुसरी अनुभवाची फळी तयार करणे हे सुज्ञ मतदार म्हणून आपले कर्तव्य नाही काय?
दिसला पंजा की मार शिक्का... विचार न करता???
पहा विचार करुन माझे विचार पटले तर....
जय हिंद जय महाराष्ट्र
- सागर
अवांतरः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाका अशी स्वतः गांधीजींची इच्छा होती म्हणे... पण नेहरु प्रभृतींनी विरोध केला आणि सत्तेत सहभागी होण्याच्या लालसेने काँग्रेस जिवंत ठेवली... आता सत्तालोलुप कोण? हे ज्याचे त्याने ठरवावे....
Wednesday, April 1, 2009
मतांची लाचारी किती दिवस??? शो-टाईम नाऊ
Wednesday, November 26, 2008
अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे.
गुरू, 11/27/2008
काल पासून मी सर्व वृत्त वाहिन्यांवर पहात आहे. जे पाहिले ते सगळे सुन्न करुन टाकणारे आहे. अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे.
अनेक प्रश्न उपस्थित राहतात
१.आलेले अतिरेकी सगळे गुजरात मधून मुंबईला थेट गेट वे ऑफ इंडिया मधून आले आणि सगळीकडे पसरले अशी बातमी आहे न्यूज चॅनल्स ची.
सागरी सीमा सुरक्षा दले काय झोपा काढत होती का? की पैसे खाऊन बोटी चेक न करण्याच्या विलासी शौक पायी कर्तव्याचा विसर पडला ?
२.मुंबई पोलिस चा एक हवालदार गोळी लागलेला चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहिले. काय करावे त्याने? बिचार्याच्या हातात काठी होती. काठीने लढावे की काय त्याने एके-४७ बरोबर?
हा सरकारचा नाकर्तेपणा आहे की पोलिस स्वतःच्या कर्मचार्यांनाच सुरक्षा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय कप्पाळ देणार?मुंबईत राहणार्या आपल्या बांधवांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे?सरकारने याचा जाब दिला तर पाहिजेच. पण एवढी वर्षे झोपा काढत होते की काय सरकार?
ना सागरी सीमेवर लक्ष, ना भूसीमेकडे लक्षसगळे लक्ष आपले मतांच्या लाचारीकडे..... बांगला देशी लाखोंच्या संख्येने राजरोस भारतात सगळीकडे रोज पसरत आहेत आणि सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.
ज्यांची निष्ठा सीमेपार वाहिलेली आहे अशांना आपल्या देशाचे नागरिकत्व? अरे कुठे फेडतील हे पाप काँग्रेसवाले... नरकातही यांना जागा मिळणार नाही. त्यांच्यासाठी यमालाही खास नरक तयार करावा लागेल.
राष्ट्रहित हे सगळ्या राजकारणापेक्षा पहिले आहे हे काँग्रेसच्या लक्षात का नाही येत?
घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध आणि मुंबईकरांचे अभिनंदन की अशा आतंकी कारवायांमधेही पळून न जाता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जखमींना मदत केली.
आणि इंग्लंड टीमचाही जाहीर निषेध की असल्या अतिरेकी हल्ल्याचे कारण काढून मोठ्या पराभवाची मानहानी टाळून मैदानातून पळ काढला...
(देशभक्त) सागर