Wednesday, November 26, 2008

अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे.

गुरू, 11/27/2008

काल पासून मी सर्व वृत्त वाहिन्यांवर पहात आहे. जे पाहिले ते सगळे सुन्न करुन टाकणारे आहे. अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे.

अनेक प्रश्न उपस्थित राहतात

१.आलेले अतिरेकी सगळे गुजरात मधून मुंबईला थेट गेट वे ऑफ इंडिया मधून आले आणि सगळीकडे पसरले अशी बातमी आहे न्यूज चॅनल्स ची.

सागरी सीमा सुरक्षा दले काय झोपा काढत होती का? की पैसे खाऊन बोटी चेक न करण्याच्या विलासी शौक पायी कर्तव्याचा विसर पडला ?

२.मुंबई पोलिस चा एक हवालदार गोळी लागलेला चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहिले. काय करावे त्याने? बिचार्‍याच्या हातात काठी होती. काठीने लढावे की काय त्याने एके-४७ बरोबर?

हा सरकारचा नाकर्तेपणा आहे की पोलिस स्वतःच्या कर्मचार्‍यांनाच सुरक्षा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय कप्पाळ देणार?मुंबईत राहणार्‍या आपल्या बांधवांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे?सरकारने याचा जाब दिला तर पाहिजेच. पण एवढी वर्षे झोपा काढत होते की काय सरकार?

ना सागरी सीमेवर लक्ष, ना भूसीमेकडे लक्षसगळे लक्ष आपले मतांच्या लाचारीकडे..... बांगला देशी लाखोंच्या संख्येने राजरोस भारतात सगळीकडे रोज पसरत आहेत आणि सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.
ज्यांची निष्ठा सीमेपार वाहिलेली आहे अशांना आपल्या देशाचे नागरिकत्व? अरे कुठे फेडतील हे पाप काँग्रेसवाले... नरकातही यांना जागा मिळणार नाही. त्यांच्यासाठी यमालाही खास नरक तयार करावा लागेल.

राष्ट्रहित हे सगळ्या राजकारणापेक्षा पहिले आहे हे काँग्रेसच्या लक्षात का नाही येत?

घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध आणि मुंबईकरांचे अभिनंदन की अशा आतंकी कारवायांमधेही पळून न जाता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जखमींना मदत केली.
आणि इंग्लंड टीमचाही जाहीर निषेध की असल्या अतिरेकी हल्ल्याचे कारण काढून मोठ्या पराभवाची मानहानी टाळून मैदानातून पळ काढला...

(देशभक्त) सागर