BLOG: http://soneripahat.blogspot.com/
येत्या १३ ऑक्टोबर २००९ ला महाराष्ट्राचे भवितव्य मतपेटीत बंद होईन. पण त्या अगोदर आपले मत योग्य पक्षाला दिले जाते आहे की नाही हे बघणे प्रत्येक जागरुक मतदाराचे पहिले कर्तव्य आहे. आजची तरुण , मध्यमवयीन आणि वृद्ध पीढी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा वा स्वत:ची कामे करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात मग्न राहतात. आपण मतदानाच्या दिवशी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारायला हवा. आपण स्वत: खूप गंभीर होणे खूप आवश्यक आहे. सर्व जगात लोकशाही प्रभावीपणे टिकवणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. लोकशाही पद्धतीने मतदान होते हे खरे आहे. पण योग्य उमेदवार लोक निवडून देतात का? हा खरा चिंतेचा विषय आहे.
मत देऊ शकणार्या प्रत्येकाने मत देण्यापूर्वी आपल्याला अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या जगण्यासाटी आवश्यक मूलभूत गरजा स्रहजपणे उपलब्ध आहेत का? जर ह्या मूलभूत गरजांसाठी चैन म्हणून झगडावे लागत असेन तर स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तीची अवस्था अशी का? हा खरेच खूप मोठा गंभीर प्रश्न आहे.
आता उदाहरणच द्यायचे झाले तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात २-३ वर्षांपूर्वी असणारे जमीन आणि फ़्लॅट्स चे भाव आकाशाला जाऊन भिडले आहेत. आर्थिक मंदी आली तेव्हा ह्या मुजोर बिल्डर लॉबीने जेवढ्या तेजीने भाव वाढवले तसे खाली न आणता स्थिर ठेवून पुन्हा वाढवत आहेत. ह्या सर्व भांडवलदारांवर कोणीतरी अंकुश ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत हे काम फ़क्त राज ठाकरे प्रभावीपणे करताना दिसत आहेत. सत्तेत असणा~र्या व विरोधी पक्षात असणार्र्या प्रमुख पक्षांनी हे काम करणे हे त्यांचे कर्तव्य होते. पण कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. मराठी माणसाला सगळे गृहीत धरतात आणि मराठी माणूस हे पहात बसण्यशिवाय काही करु शकत नाही.
सध्याच्या परिस्थितीत मला तरी राज ठाकरे यांना संधी देण्याचा योग्य पर्याय दिसत आहे. असे का? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. आपण काही कारणे पाहूया मग तुम्ही स्वत: ठरवा योग्य नि अयोग्य...
राज ठाकरेंना पाठींबा देण्याची गरज आहे असे मला तरी वाटते आहे. यातून दोन संध्या मला तरी दिसत आहेत.
अ. राज ठाकरेंना संधी दिली तर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना काम करुन दाखवावे लागेल - आणि
ब. कॉंग्रेस , राष्ट्रवादी, सेना , भाजपा व इतर पक्षांना लोकांसाठी खर्र्या अर्थाने कामे करावी लागतील
म्हणजे झाला तर मराठी माणसाचाच फ़ायदा आहे. आणि अशी सुवर्णसंधी मराठी माणसाने गमावू नये असे मला वाटते. आणि मनसे नावाच्या वादळाने कामे नाही केली तर ५ वर्षांनी काय करायचे ते तुमच्या मतदार राजाच्याच हातात आहे की. ६० वर्षांच्या मानहानीच्या तुलनेत ५ वर्षे अपेक्षांची काय वाईट?
१. मला संधी द्या ... आधी जे कधी घडले नव्हते ते घडवून दाखवीन. आणि यात अपेशी ठरलो तर पुन्हा तुमच्या दारात मत मागायला येणार नाही. - असे आजपर्यंत गेल्या ६०-६२ वर्षांत एक तरी नेता म्हणाला होता का हो?
२. नितिन गडकरीं हे विरोधी पक्षातील असूनही त्यांना रिझल्ट देणारा माणूस म्हणून त्यांच्या कामांची उदाहरणे देऊन कौतुक करणे हे आजपर्यंत कोणा राजकीय नेत्याने केले होत का हो?
३. जेट ऐअरवेज... करण जोहर चा चित्रपट... मराठी पाट्या .... रेल्वेत फ़क्त उत्तरभारतीयांच्या भरतीच्या विरोधातील आंदोलने... हे राज ठाकरे यांनी दिलेले रिझल्ट्स आहेत. सरकार सत्तेवर असून या प्रश्नांना न्याय देऊ शकले नव्हते.
तेच काम राज ठाकरे यांनी सत्तेत नसताना करुन दाखवले हे विशेष. राज ठाकरेंना सत्तेची चावी हातात दिली तर कामे किती प्रभावी पद्धतीने होतील?
मराठी माणसाने आता स्वत:बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे . आपण दुसर्र्या राज्यांमधे जातो तेव्हा हिंदी चालते का? आपल्या शेजारचीच राज्ये घ्या ना... गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ...
आपले बहुमोल मत देण्यापूर्वी मराठी माणसांपुढे उभे असणारे प्रश्न विचारात घेऊन मतदान करावे अशी माझी विनंती आहे.
१. घराचे स्वप्न साकार होते आहे का?
२. सकस अन्न पोटभर मिळते का? (रेशनच्या निकृष्ट दर्जाच्या तांदूळावर-धान्यावर मराठी माणसाने जगायचे का?)
३. मराठी मुला-मुलींना रोजगाराच्या संधी सहजपणे मिळतात का?
४. दुकानात खरेदीसाठी जातात तेव्हा मराठी ग्राहक म्हणून आदर मिळतो का?
५. उद्योगधंदे करण्याबाबत मराठी तरुणांना सरकारी प्रोत्साहन प्रत्यक्ष मिळते का?
६. मराठी संस्कृती, मराठी भाषा यांचा सन्मान आपल्याच महाराष्ट्रात होतो का?
विचार करा आणि मत द्या
जय महाराष्ट्र
सागर
No comments:
Post a Comment