Wednesday, April 1, 2009

मतांची लाचारी किती दिवस??? शो-टाईम नाऊ

अंजली बाईंचे प्रेस ला दिलेले वक्तव्य ऐकले आहे मी. त्यांचे म्हणणे आहे की माझी भूमिका माझ्या विरोधकांना समजायला जरा वेळ लागेल.

कदाचित कसाब चा वकील होऊन त्याच्यावरील आरोप कायद्याने सिद्ध करण्यात कोर्टाला मदत करणे हा त्यांचा हेतू असू शकेल. तसे असेल तर ती एक प्रकारची देशभक्ती नाही का?
नाहीतर कोणी वकील मिळत नसल्यामुळे कसाबदेखील अफजल गुरुसारखा आपल्या देशात जेलमधे आरामात जीवन जगेन.... मग परत कोणतेतरी विमान हायजॅक होईन किंवा कोणास ओलिस धरून अफ्जल आणि कसाबला सोडावे लागेल... 'वेडनस्डे' चित्रपटातील एक वाक्य आठवते.... एक आदमी मुजरीम है के नही ये साबित करने के लिये आपको १० साल लगते है| आपको नही लगता की ये आपकी काबिलियत पे सवाल है? ह्यातून सरकारी नोकरशाहांनी बोध घेण्याची गरज आहे. नाहीतर मुंबई, अहमदाबाद, दिल्ली अशा ठिकाणी झालेल्या बाँम्ब्स्फोटांची संख्या अजून शेकड्यांनी वाढेन आणि लवकरच तालुका ठिकाणीदेखील अशा घटना सातत्याने घडू लागतील. मालेगांव बाँब्स्फ्स्फोट हे उत्तम उदाहरण आहे.

सर्वसामान्यांच्या आयुष्याची खात्री देण्यात सध्याचे राज्य आणि केंद्र सरकार दोघेही अतिशय नालायक ठरले आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते,...येत्या निवडणूकीत काँग्रेसला आंधळेपणाने मते देणार्‍या मतदारांना एक लक्षात आणून देऊ इच्छितो की त्यांची मते चुकीच्या आणि अपात्र लोकांना सत्तेवर आणतात. आणि अशा चुकांची फळे याच मतदारांना भोगावी लागतात ही गोष्ट मात्र सर्वच विसरतात.
मी असे नाही म्हणत की भाजप , शिवसेना वा अन्य कोणी पक्ष ही परिस्थिती एका रात्रीत बदलू शकेन. पण ६० वर्षे एकाच पक्षाला वेळोवेळी संधी देऊन काय साध्य झाले? पण ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा काँग्रेस पक्षाने देशाला लाभ करुन देण्यापेक्षा स्विस बँकेतील आपली खाती फुगविण्याकडे जास्त लक्ष पुरविले.... परिणामी देशावर कर्जांचा डोंगर साचला. याचाच परिणाम म्हणून आज आपण सगळे १० % सर्व्हिस टॅक्स , १० - ३०% इन्कम टॅक्स देतो.... आपल्याच खिशातील पैसे सत्तेवरचे नेते स्वत:च्या खिशात भरत आहेत आणि सर्वसामान्य जनता मूकपणे बघत बसली आहे. आपल्या देशावर कर्ज नसेन तर आपल्या खिशातील पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कापला जाणार नाही. तोच पैसा सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कार्यक्षमतेने वापरला जाईन.इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्यांचे योगदान जे आहे ते वैयक्तिक आहे. यात इतर काँग्रेसी नेत्यांचा काही हात आहे असे मला अजिबात नाही वाटत. मग इतर पक्षांना संधी देणे हे सुजाण नागरीक म्हणून आपले कर्तव्य नाही का? बघा थोडासा विचार करुन. तुमचे तुम्हालाच पटेल.
अन्यायाविरुद्ध रक्त पेटून उठणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्वजण ठेवतो. पण स्वतःच्या बांधवांशीच लढण्यात हे सगळे शौर्य वाया घालवतो. मग यु.पी.-बिहारी लोक रिक्षा, टॅक्सी , मजुरी अशा अनेक क्षेत्रांवर डेरा टाकून बसलेले असतात आणि आपले मराठी लोक इथेही मागे राहतात.

बांगलादेशींच्या मुंबई व सगळ्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने झोपड्या उभ्या रहात आहेत. मतांच्या लाचारीसाठी या बांगलादेशींना भारतीय नागरिकत्वासाठी आवश्यक कागदपत्रे अल्पशा मोबदल्यात खिरापतीसारखी वाटली जात आहेत. लोकहो अशा गोष्टींकडे 'मला काय त्त्याचे' म्हणून दुर्लक्ष केलेत तर आपल्याच महाराष्ट्रात आपणच परके होऊ. संततीनियमन कायदा फक्त एकाच धर्मासाठी लागू का होतो? साधे गणित आहे मित्रांनो, मतांची लाचारी नाही का वाढत? ते ही राजरोस... धार्मिक यात्रांची निमित्ते करुन करोडो रुपयांचे अनुदान खिरापतीसारखे वाटले जाते. हा कसला सर्वधर्मसमभाव? अमरनाथ यात्रेसाठी वा मानस सरोवर यात्रेसाठी मिळते का सरकारी अनुदान?
मराठी मतांची ताकद किती आहे हे दाखवून देण्याची ही निवडणूक खरेच खूप मोठी संधी आहे. आपण एक समाजमन म्हणून विचार न करता मते देतो. आपण स्वतःच आपल्या अधिकारांच्या बाबतीत अंधारात राहतो आणि मते देतो...
महाराष्ट्राच्या विकासाच्या, महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या , महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी करणार्‍या पक्षालाच (उमेदवाराला नव्हे) मत दिले पाहिजे असे मला वाटते. बाकी सुज्ञ मतदार जागा होतो की नाही हे येणारा काळच सांगेन.
मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता वा समर्थक नाही. पण माझे यावेळचे मत राज ठाकरे यांच्या 'मनसे' लाच. बरेच लोक म्हणतात राज ठाकरे यांचा मार्ग गुंडगिरीचा आणि जबरदस्तीचा वाटतो. मला सांगा मराठी लोकांना 'मनसे' ने कधी त्रास दिला? उलट मराठी लोकांसठी , मराठी लोकांना नोकर्‍यांत प्राधान्य मिळावे यासाठीच भांडतात ना ते? इथेही मला 'वेडनस्डे' चित्रपटातील वाक्य आठवते.... मै रास्ते के बारे मे नही नतीजों के बारे में सोचता हूं| :)
जयहिंद !!! जय महाराष्ट्र !!! (देशभक्त आणि महाराष्ट्रभक्त) सागर

No comments: