Tuesday, January 19, 2010

गोल्डनबॉय बिंद्राने खेळ सोडून द्यावा

वैतागून खेळाडूंनी क्रिडा क्षेत्राला रामराम ठोकणे काही नवीन नाही... 
धनराज पिल्ले सारखा गुणी खेळाडू ज्याला ध्यानचंद नंतरचा तारा समजले जायचे, त्याला पण हॉकी च्या पदाधिकार्‍यांच्या गलिच्छ राजकारणाने सडवले आणि निवृत्त होण्यास भाग पाडले.... 

बिंद्राच्या बाबतीत जे झाले त्यासाठी लालफितीचे तानाशाही अधिकारी जास्त जबाबदार आहेत. अनुशासन कोणाला शिकवतात हे? जिथे सरकारला कोणतेही अनुशासन नाही. मनमानी कारभार करते तिथे क्रिडा क्षेत्रात ही घाण पसरली तर नवल ते कसले? पाणी नेहमी वरुन खाली वाहते... 


ऑलंपिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूशी असे वर्तन करणार्‍या या भ्रष्ट पदाधिकार्‍यांनी स्वत: नेमबाजीसाठी कधी बंदूक हातात धरली असेन का? फक्त आणि फक्त पैसा खाणे हेच ज्यांना माहित आहे त्यांनी साधी या गोष्टीची पण सोय केली नाही की खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. कशाला आपले खेळाडू परदेशी जातील मग? इथे सुविधा देण्याच्या नावाने बोंब आणि मग परदेशी खेळाडू स्वतःच्या खर्चाने गेले तरी पोटात दुखते यांच्या...  


हॉकीची टीम पण म्हणाली होती की आम्ही आमच्या पैशाने वर्ल्ड कप खेळू. यातच क्रिडा क्षेत्राच्या भ्रष्ट्राचाराचा बुडबुडा फुटतो. पण सरकारी मंत्रीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान देखील मांजरासारखे डोळे बंद करुन बसतात. मुळात दर्जा निर्माण करण्याबद्दल शासकीय यंत्रणाच झोपलेली आहे तर खेळाडूंनी किंवा सर्वसामान्यांनीही काय करावे?  


सर्व खेळाडूंना मोलाचा सल्ला : हा देश दर्जेदार खेळाडूंसाठी नाहिये. फक्त वशिला आणि मोठ्या नेत्याचा पाठींबा असणार्‍या खेळाडूंसाठीच आहे. तेव्हा खेळ सोडा आणि आपले पोटापाण्याचे उद्योग बघा ... किंवा पैसे असतील तर विदेशात जा. तिथे तुमची कदर होईन....


(क्रिडा क्षेत्राच्या नासाडीने खिन्न झालेला) सागर

No comments: