Sunday, December 19, 2010

भारताचे शत्रू कोण? : प्रारंभ

मित्रांनो,
भारताची सध्याची सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अगदी कंगाल अवस्थेत आहे. मला वाटलेले, पटलेले, सुचलेले विचार तुमच्यापुढे मांडत आहे. माझी मते तुम्हाला पटतील न पटतील. पण या अतिशय संवेदनशील विषयावर काहितरी कृती होणे नक्की गरजेचे आहे. देश चहू बाजूंनी शत्रूंनी घेरला जात असताना, शत्रूच्या कारवाया उघड्या डोळ्यांना दिसत असताना, शत्रू प्रबळ होत असताना केवळ मला काय त्याचे ही बघ्याची भूमिका सध्याचे केंद्र सरकार घेत आहे हे उघड उघड दिसते आहे. सर्वसामान्य जनतेला कळते आहे. तरीही जनतेचा विश्वास जपण्यासाठी सरकार कडून कोणतीही हालचाल दिसत नाहीये. या चिंतनातून या लेखमालेचा उद्भव झाला असे म्हटले तरी चालेल.

अनेक विषय आहेत. त्यांचा माझ्या कुवतीप्रमाणे परामर्श घेईनच. पण या विचारांत तुम्हा सर्व बुद्धीवंतांचे योगदान सकारात्मक चर्चेने सहभाग अपेक्षित आहे. या लेखमालेत मी ढोबळमानाने पुढील विषय हाताळेन.

- चीनचे वाढते संकट
- पाकिस्तान - चोराच्या उलट्या बोंबा
- बांगलादेश - एक संधी की अडचण?
- श्रीलंका - सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा - पण मित्र की शत्रू
- नेपाळ - हळूहळू ड्रॅगनच्या पंज्याखाली
- भारतातील संवेदनशील टापू
- भारताचे संरक्षण धोरण (भू, वायू व आकाश)
- भारताचे परराष्ट्र धोरण
- काश्मीर एक अश्वत्थाम्याची जखम
- कॉमनवेल्थ गेम्स
- भ्रष्ट्राचार व राजकारण
- रशिया निती
- युरोपिय देशांशी संबंध
- इंग्लंडचे महत्त्व

असा सर्वसाधारण मनात आलेला विचार आहे. हळूहळू आम्ही त्यातील विषय वाढवूच.
सुरुवातीला एवढा संक्षिप्त आलेख पुरेसा आहे.

प्रारंभः
भारताची फाळणी १९४७ साली झाली आणि लाखोंच्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक स्थलांतरीत झाले. याबाबतीत एक स्पष्टपणे नमूद करायचे आहे की भारताची फाळणी जी झाली ती मुख्य करुन मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे या मागणीच्या पूर्ततेसाठी झाली होती. भारताच्या फाळणीमागे सूर्यप्रकाशाएवढे एवढे स्पष्ट उद्दिष्ट असतानाही महात्मा गांधींनी ज्या मुसलमानांना भारतात रहायचे आहे त्यांनी भारतात रहावे हा अट्टाहास का धरला होता याचे कारण त्यांनाच माहिती. पण देशाचे तुकडे करणे हे मुळात धर्मावर आधारित असताना ही खेळी म्हणजे गांधीजींची एक मोठी राजकीय चूकच म्हणावी लागेल. 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात डोकावले की कोणालाही लक्षात येईल की गांधीजींच्या प्रयोगांची केव्हढी मोठी किंमत हिंदुस्थानाला चुकवावी लागली आहे. धर्मावर आधारित विभागण्या त्याप्रमाणे झाल्या असत्या तर आज भारतात खरेच खूप शांती असती. किंवा आपल्यापुढचे विषय वेगळे असते. कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोटांत मृत्यू, धार्मिक दंगे, असे केले तर मुसलमानांना काय वाटेल? असल्या टांगत्या तलवारीखाली जगावे लागले नसते.

सध्या देशात एक प्रचंड संशयाचे वातावरण आहे. हिंदु मुसलमानाकडे साशंकपणे का होईना पण सद्भावनेने बघत जरी असला तरी मुसलमानांकडून तो भाव दिसत नाही. कारणे काही असोत. पण १,००० वर्षे हिंदूंवर राज्य केले असल्याच्या रम्य इतिहासाची स्वप्ने पुन्हा काही माथेफिरु इस्लामी नेत्यांना पडू लागली आहेत. अशा माथेफिरु मुस्लिमांना पुन्हा हिंदुंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली करायच्या आहेत, पुन्हा मंदिरे फोडून मशिदी उभारायच्या आहेत. पुन्हा हिंदूंच्या स्त्रियांना जबरदस्तीने भोगायचे आहे. त्यासाठी मिळेल त्या क्षेत्रांत दहशतीचे तंत्र सर्रासपणे ते वापरत आहेत. मग ते फिल्म इंडस्ट्री मध्ये मुस्लिम हिरोंचा दबदबा टिकवण्यासाठी असो, वा संगीत क्षेत्रांत पाकीस्तानी गायकांनाच चांगली गाणी मिळतील यासाठीचा कटाक्ष असो, लव जिहाद असो, ठीक ठीकाणी मशिदी उभारणे असो, धर्माच्या नावाखाली रस्त्यांवर नमाज पढणे असो. वा कोणते फतवे असोत. इस्लामी नेत्यांचे सर्वसामान्य मुस्लिम जनतेला केले जाणारे मार्गदर्शन हे धर्मांधतेचे लक्षण आहे. या धर्मांध स्वप्नाचे पडसाद आपल्या आजूबाजूला उमटत आहेत. पण आपण डोळे झाकून बसलो तर आपल्या घराची आहुति त्यात पडल्याशिवाय राहणार नाही.

लव्ह जिहाद ही काही केवळ कपोल कल्पित कल्पना आहे असे मला तरी वाटत नाही. समाजात कित्येक उदाहरणे आहेत. कोण त्यांतून शहाणे झाले कोण फसले हा वेगळा विषय आहे. पण समाजाच्या सर्वच थरांतून हिंदू मुलींना मुसलमान मुले आवडण्याचे प्रमाण अचानक कधी नव्हे तेवढे वाढू लागले आहे. प्राचीन धर्मग्रंथांत म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा समाज भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजाचा धर्म भ्रष्ट होतो, जेव्हा धर्म भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजातील स्त्रीयांचे शील भ्रष्ट होते, ही सुरुवात थोपवता आली नाही तर समाजाचे अधःपतन निश्चित आहे. हिंदू स्त्रियांनी वैयक्तीक विचार करण्याची देखील खूप गरज आहे. मुख्य म्हणजे आजच्या स्त्रिया सुशिक्षित आहेत स्वतंत्र प्रज्ञेच्या धनी आहेत. प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसतात हे मान्य पण आपण काय करतो आहोत याचा थोडा विचार केला तरी त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येईन. समाजात आता त्याची मोठ्या प्रमाणावर उदाहरणे यायला सुरुवात झाली आहेत

सैफ अली खान ने करिना कपूर साठी अमृता सिंग ला सोडले ( २ मुले झाली असूनही)
मोहम्मद अझरुद्दीन ने संगीता बिजलानीला ज्वाला गुट्टा साठी सोडले (त्यांनाही मुले आहेत) (ज्वाला गुट्टाने चेतन आनंदला सोडले)
अरबाज खानची बायको मलाईका अरोरा
अमृता अरोरा चा नवरा शकील लडाक
सलमान रश्दीची बायको पद्मा
शाहरुख खानची बायको गौरी

हीच स्टोरी टीव्ही सिरियल्स मधून कामे करणार्‍या कलाकारांमध्येदेखील दिसते.
अदनान सामी राणी मुखर्जीच्या मागे होता (शेवटच्या क्षणी फिसकटलेली गोष्ट)
सलमान खान ऐश्वर्या राय च्या मागे होता. (ही कहाणीपण ऐन वेळी फिसकटलेली)

हिंदू पुरुष आणि मुसलमान स्त्री अशा जोड्या समाजातील सर्वच थरांत किती दिसतात? बघा थोडा विचार करा.
मला कट्टर हिंदूत्व आणि कट्टर इस्लाम या वादांत नाही पडायचय. पण समाजात आपल्यासमोर काय चाललं आहे हे दाखवून द्यायचा हा प्रयत्न आहे. वरील उदाहरणे फक्त ग्लॅमर विश्वातील आहेत. पण अनेक ख्यातनाम कंपन्यांत मोठ्या पदांवर असलेल्या स्त्रियांचे नवरे मुस्लिम आहेत. अथवा मुस्लिम पुरुषांच्या बायका हिंदू आहेत. तुम्ही रहात असलेल्या छोट्या मोठ्या मोहल्ल्यातील एखादी तरुण मुलगी गायब होते व मुसलमान बॉयफ्रेंड बरोबर लग्न करुन प्रकट होते. या कायद्याच्या चौकटीत घडत असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांची तीव्रता आपल्याला जाणवत नसेन तर येणारा काळ कठीण आहे एवढे नक्की सांगता येईल.

हा उदारपणा (गांधीजीच्या भाषेतील सर्वधर्मसमभाव) फक्त हिंदूंच्याच स्त्रिया का दाखवतात? क्षणिक सुख आज आपल्या जीवनात एवढे मोठे झाले आहे? की एक सामाजिक जबाबदारी पण आपण नाकारतो आहोत? समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. हिंदूंच्या स्त्रियांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होण्याची गरज आहे.

थोडेसे आत्मपरिक्षण आपल्याला आत्मग्लानीतून बाहेर आणू शकेल. बघा विचार करा आणि समाज वाचवा.
लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण अजून खूप ज्वलंत प्रश्न आहेत.
तूर्तास इथेच थांबतो. पुढची भेट पुढच्या लेखात. चीन बद्दल....

Friday, March 19, 2010

मराठी नवीन वर्षाच्या (सन १९३२) च्या हार्दीक शुभेच्छा

मराठी नवीन वर्षाच्या (सन १९३२) च्या हार्दीक शुभेच्छा

Tuesday, January 19, 2010

गोल्डनबॉय बिंद्राने खेळ सोडून द्यावा

वैतागून खेळाडूंनी क्रिडा क्षेत्राला रामराम ठोकणे काही नवीन नाही... 
धनराज पिल्ले सारखा गुणी खेळाडू ज्याला ध्यानचंद नंतरचा तारा समजले जायचे, त्याला पण हॉकी च्या पदाधिकार्‍यांच्या गलिच्छ राजकारणाने सडवले आणि निवृत्त होण्यास भाग पाडले.... 

बिंद्राच्या बाबतीत जे झाले त्यासाठी लालफितीचे तानाशाही अधिकारी जास्त जबाबदार आहेत. अनुशासन कोणाला शिकवतात हे? जिथे सरकारला कोणतेही अनुशासन नाही. मनमानी कारभार करते तिथे क्रिडा क्षेत्रात ही घाण पसरली तर नवल ते कसले? पाणी नेहमी वरुन खाली वाहते... 


ऑलंपिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूशी असे वर्तन करणार्‍या या भ्रष्ट पदाधिकार्‍यांनी स्वत: नेमबाजीसाठी कधी बंदूक हातात धरली असेन का? फक्त आणि फक्त पैसा खाणे हेच ज्यांना माहित आहे त्यांनी साधी या गोष्टीची पण सोय केली नाही की खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. कशाला आपले खेळाडू परदेशी जातील मग? इथे सुविधा देण्याच्या नावाने बोंब आणि मग परदेशी खेळाडू स्वतःच्या खर्चाने गेले तरी पोटात दुखते यांच्या...  


हॉकीची टीम पण म्हणाली होती की आम्ही आमच्या पैशाने वर्ल्ड कप खेळू. यातच क्रिडा क्षेत्राच्या भ्रष्ट्राचाराचा बुडबुडा फुटतो. पण सरकारी मंत्रीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान देखील मांजरासारखे डोळे बंद करुन बसतात. मुळात दर्जा निर्माण करण्याबद्दल शासकीय यंत्रणाच झोपलेली आहे तर खेळाडूंनी किंवा सर्वसामान्यांनीही काय करावे?  


सर्व खेळाडूंना मोलाचा सल्ला : हा देश दर्जेदार खेळाडूंसाठी नाहिये. फक्त वशिला आणि मोठ्या नेत्याचा पाठींबा असणार्‍या खेळाडूंसाठीच आहे. तेव्हा खेळ सोडा आणि आपले पोटापाण्याचे उद्योग बघा ... किंवा पैसे असतील तर विदेशात जा. तिथे तुमची कदर होईन....


(क्रिडा क्षेत्राच्या नासाडीने खिन्न झालेला) सागर

Thursday, January 7, 2010

नवीन वर्ष २०१०

इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सन २०१० हे नवीन वर्ष सुरु होऊन आज ७ दिवस झालेत.
नवीन वर्षाची सुरुवात ही खरेतर सर्व जण नवीन संकल्प करण्यासाठी वापरतात.
मी पण काहीतरी ठरवले आहे. भरपूर लेखन करायचे हा त्यातील एक संकल्प.
जनसामान्यांचे विचार या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

*** सध्यातरी २०१० या नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा ***
जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!
- सागर

Thursday, October 8, 2009

महाराष्ट्राचे भवितव्य : १३ ऑक्टॉबर २००९ : विधानसभा निवडणूक

BLOG: http://soneripahat.blogspot.com/
येत्या १३ ऑक्टोबर २००९ ला महाराष्ट्राचे भवितव्य मतपेटीत बंद होईन. पण त्या अगोदर आपले मत योग्य पक्षाला दिले जाते आहे की नाही हे बघणे प्रत्येक जागरुक मतदाराचे पहिले कर्तव्य आहे. आजची तरुण , मध्यमवयीन आणि वृद्ध पीढी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा वा स्वत:ची कामे करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात मग्न राहतात. आपण मतदानाच्या दिवशी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारायला हवा. आपण स्वत: खूप गंभीर होणे खूप आवश्यक आहे. सर्व जगात लोकशाही प्रभावीपणे टिकवणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. लोकशाही पद्धतीने मतदान होते हे खरे आहे. पण योग्य उमेदवार लोक निवडून देतात का? हा खरा चिंतेचा विषय आहे.

मत देऊ शकणार्या प्रत्येकाने मत देण्यापूर्वी आपल्याला अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या जगण्यासाटी आवश्यक मूलभूत गरजा स्रहजपणे उपलब्ध आहेत का? जर ह्या मूलभूत गरजांसाठी चैन म्हणून झगडावे लागत असेन तर स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तीची अवस्था अशी का? हा खरेच खूप मोठा गंभीर प्रश्न आहे.
आता उदाहरणच द्यायचे झाले तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात २-३ वर्षांपूर्वी असणारे जमीन आणि फ़्लॅट्स चे भाव आकाशाला जाऊन भिडले आहेत. आर्थिक मंदी आली तेव्हा ह्या मुजोर बिल्डर लॉबीने जेवढ्या तेजीने भाव वाढवले तसे खाली न आणता स्थिर ठेवून पुन्हा वाढवत आहेत. ह्या सर्व भांडवलदारांवर कोणीतरी अंकुश ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत हे काम फ़क्त राज ठाकरे प्रभावीपणे करताना दिसत आहेत. सत्तेत असणा~र्या व विरोधी पक्षात असणार्र्या प्रमुख पक्षांनी हे काम करणे हे त्यांचे कर्तव्य होते. पण कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. मराठी माणसाला सगळे गृहीत धरतात आणि मराठी माणूस हे पहात बसण्यशिवाय काही करु शकत नाही.

सध्याच्या परिस्थितीत मला तरी राज ठाकरे यांना संधी देण्याचा योग्य पर्याय दिसत आहे. असे का? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. आपण काही कारणे पाहूया मग तुम्ही स्वत: ठरवा योग्य नि अयोग्य...
राज ठाकरेंना पाठींबा देण्याची गरज आहे असे मला तरी वाटते आहे. यातून दोन संध्या मला तरी दिसत आहेत.
अ. राज ठाकरेंना संधी दिली तर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना काम करुन दाखवावे लागेल - आणि
ब. कॉंग्रेस , राष्ट्रवादी, सेना , भाजपा व इतर पक्षांना लोकांसाठी खर्र्या अर्थाने कामे करावी लागतील
म्हणजे झाला तर मराठी माणसाचाच फ़ायदा आहे. आणि अशी सुवर्णसंधी मराठी माणसाने गमावू नये असे मला वाटते. आणि मनसे नावाच्या वादळाने कामे नाही केली तर ५ वर्षांनी काय करायचे ते तुमच्या मतदार राजाच्याच हातात आहे की. ६० वर्षांच्या मानहानीच्या तुलनेत ५ वर्षे अपेक्षांची काय वाईट?

१. मला संधी द्या ... आधी जे कधी घडले नव्हते ते घडवून दाखवीन. आणि यात अपेशी ठरलो तर पुन्हा तुमच्या दारात मत मागायला येणार नाही. - असे आजपर्यंत गेल्या ६०-६२ वर्षांत एक तरी नेता म्हणाला होता का हो?

२. नितिन गडकरीं हे विरोधी पक्षातील असूनही त्यांना रिझल्ट देणारा माणूस म्हणून त्यांच्या कामांची उदाहरणे देऊन कौतुक करणे हे आजपर्यंत कोणा राजकीय नेत्याने केले होत का हो?

३. जेट ऐअरवेज... करण जोहर चा चित्रपट... मराठी पाट्या .... रेल्वेत फ़क्त उत्तरभारतीयांच्या भरतीच्या विरोधातील आंदोलने... हे राज ठाकरे यांनी दिलेले रिझल्ट्स आहेत. सरकार सत्तेवर असून या प्रश्नांना न्याय देऊ शकले नव्हते.
तेच काम राज ठाकरे यांनी सत्तेत नसताना करुन दाखवले हे विशेष. राज ठाकरेंना सत्तेची चावी हातात दिली तर कामे किती प्रभावी पद्धतीने होतील?

मराठी माणसाने आता स्वत:बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे . आपण दुसर्र्या राज्यांमधे जातो तेव्हा हिंदी चालते का? आपल्या शेजारचीच राज्ये घ्या ना... गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ...

आपले बहुमोल मत देण्यापूर्वी मराठी माणसांपुढे उभे असणारे प्रश्न विचारात घेऊन मतदान करावे अशी माझी विनंती आहे.

१. घराचे स्वप्न साकार होते आहे का?
२. सकस अन्न पोटभर मिळते का? (रेशनच्या निकृष्ट दर्जाच्या तांदूळावर-धान्यावर मराठी माणसाने जगायचे का?)
३. मराठी मुला-मुलींना रोजगाराच्या संधी सहजपणे मिळतात का?
४. दुकानात खरेदीसाठी जातात तेव्हा मराठी ग्राहक म्हणून आदर मिळतो का?
५. उद्योगधंदे करण्याबाबत मराठी तरुणांना सरकारी प्रोत्साहन प्रत्यक्ष मिळते का?
६. मराठी संस्कृती, मराठी भाषा यांचा सन्मान आपल्याच महाराष्ट्रात होतो का?

विचार करा आणि मत द्या
जय महाराष्ट्र
सागर

Thursday, August 20, 2009

जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले?

जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले? हा मोठा प्रश्न असेन भाजपात काम केलेल्या सर्वांसाठी आणि भाजपा समर्थक सर्वच मतदारांच्या मनात.

पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा आणि जसवंतसिंह यांच्या मित्रवर्यांमध्ये हे पुस्तक अगोदरच वितरित झालेले होते. तसे बहुतेक सर्व पुस्तकांच्या बाबतीत होत असते ....अभिप्रायासाठी... आडवाणी हे देखील पट्टीचे वाचक असल्यामुळे त्यांनी पुस्तक वाचले असेनच आणि त्यांची जसवंतसिंहांना बरखास्त करण्या मागे निर्णायक भूमिका असल्याचे तर्क हिंदी पत्रकार व्यक्त करत आहेत. (मी बंगळूरात राजस्थान पत्रिका वाचतो. त्यात आजच्याच अंकात यावर लेख आला आहे.)

खरेखोटे देवच जाणे..

पण जसवंतसिंहांच्या पुस्तकामुळे 'जीनांमुळे' पाकीस्तानची निर्मिती झाली हे सत्य खोटे ठरु शकत नाही. भारताच्या फाळणीचा सखोल अभ्यास करुन विदेशी लेखकांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' या पुस्तकातही हेच सांगितले गेले आहे. या पुस्तकावर तर पाकीस्तानात बंदी आहे. त्यात जीनांविषयी अनेक सत्य बाबी लिहिलेल्या आहेत. जीज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

माझे स्वत:चे मत विचाराल तर गांधीजींच्या अहिंसेमुळे आपल्या भारत देशाची जेवढी हिंसा झाली आहे तेवढी जगाच्या इतिहासात कोठेही झालेली नाही. हिंसक अन्यायाविरुद्ध हिंसक प्रतिकार हेच एकमेव शस्त्र ठरते. जगाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर सगळीकडे एकच चित्र दिसते की हिंसक अत्याचाराला हिंसेनेच प्रत्युत्तर दिले तरच अन्यायाविरुद्ध जिंकता येते. ग्यारिबाल्डीने काय केले? ... जोसेफ़ मॆझिनि ने काय केले? .... स्वातंत्र्याचा लढा हिंसेनेच लढले ना?
हिटलर... नेपोलियन या हुकुमशहांना सत्ता कशी मिळाली? हिंसेच्या माध्यमातूनच ना? ... हिटलर ला नेस्तनाबूत कसे केले गेले? ... युद्धानेच ना?...

जो पर्यंत समस्त भारतवासी गांधीजींच्या किडलेल्या आणि सडलेल्या तत्त्वांना घट्ट जळवासारखे पकडून बसलेल्या कॊंग्रेसचे आंधळे अनुकरण करतील तर येत्या काही दशकांत भारत या नावाचा देश आणि हिंदू नावाचा महान धर्म नष्ट झालेला असेन.
जाज्ज्वल्य देशभक्ती जागवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे खूप आवश्यक आहे समस्त भारतवासियांनो.... एकदाच किंमत मोजावी लागेल पण आपल्या पुढच्या १००० पिढ्या सुखाने जगतील... तेव्हा नष्ट होऊन इतिहासाचे जीर्ण पान व्हायचे का इतिहास हादरवून सोडायचा ते तुमचे तुम्ही ठरवा.. जय हिंद

विषयांतर होतंय... मुद्याकडे परत वळतो... तर जसवंतसिंहांना मिळालेली शि़क्षा ही योग्य आहे असे माझे मत आहे.
अशा सडक्या मनोवृत्तींना त्यांची जागा दाखवून देणे खूप आवश्यक आहे. भाजपाने जसवंतसिंहांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे.

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
(पूर्वीच्याच अखंड भारताचे स्वप्न पाहणारा) सागर

Thursday, May 7, 2009

अजून किती सहन करणार काँग्रेसला?

एक मोठे काम सांगू का भाजपाने केलेले?

गरिबांचे आशिर्वाद तरी मिळवले होते त्यांनी
जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवले होते भाजपाच्या सरकारने.
त्यासाठी काय काय उठाठेवी केल्या ते त्यांचे त्यांना माहीत...

पण गरिबांना ५ वर्षे एकाच दराने स्वस्त अन्न धान्य उपलब्ध करुन दिले होते...
गरिबांच्या पोटाचा विचार किमान या सरकार ने केला तरी होता...


काँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे
वीज
पाणी
पेट्रोल
२०-२२ रुपयाला मिळणारा तांदूळ ४०-६० रुपयांना मिळतोय
डाळींचेही तेच
साखर
दूध
गहू
बाजरी

सर्व्हिस टॅक्स वाढवला
व्हॅट सुरु केला

सगळ्यां जीवनावश्यक वस्तूंचे भाव तुम्ही पहा.
तुमचे तुम्हालाच कळेल सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागते आहे ते....
गरिबीरेषेखाली जगणारे व मध्यमवर्गीय या वर्गात मोडणारे जे आहेत ते सर्व देशाच्या बहुसंख्य लोकांमधे येतात. ९०% पेक्षा जास्त

तुम्हीच बोला ... सर्वसामान्य माणसाने काय करावे?

सामान्य माणसांना अणुकरार.... विदेश दौरे या गोष्टी नाही कळत हो.... त्याला फक्त पोटाला बसणारा चिमटा कळतो....
मन मारणे कळते....

काँग्रेसने इमानेइतबारे सर्वसामान्यांसाठी काम करायचे ठरवले असते तर खरेच ५-१० वर्षे पुरेशी आहेत देशाचा कायापालट करायला.
पण सर्वात जास्त स्विस बँकेत बॅलन्स फुगवण्यात काँग्रेसी नेते आघाडीवर आहेत हे सत्य नाकारता येणार नाही... यामुळेच तर सध्याचे सरकार काळया पैशावर मौन साधून आहे आणि कोणतीही कार्यवाही करत नाहीये. चोरच कसा सांगेन ही आपली चोरी आहे म्हणून :)
आडवाणींनी राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित केला असे मान्य केले तरी सत्य नाकारता येत नाही....

अरे लेको आपल्याच कष्टाचे पैसे विदेशात पडले आहेत आणि आपण त्याच चोरांना योग्य उमेदवार म्हणून निवडून देतो याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे....

एकालाच संधी किती वर्षे देणार? झाली की ५० वर्षे... दुसर्‍या पक्षांना संधी नाही मिळाली तर त्यांना अनुभव कधी येणार?

आपण सर्व मतदार लाचारीने एकच पर्याय कायम निवडत आलेलो आहोत... दुसरी अनुभवाची फळी तयार करणे हे सुज्ञ मतदार म्हणून आपले कर्तव्य नाही काय?
दिसला पंजा की मार शिक्का... विचार न करता???
पहा विचार करुन माझे विचार पटले तर....

जय हिंद जय महाराष्ट्र
- सागर
अवांतरः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाका अशी स्वतः गांधीजींची इच्छा होती म्हणे... पण नेहरु प्रभृतींनी विरोध केला आणि सत्तेत सहभागी होण्याच्या लालसेने काँग्रेस जिवंत ठेवली... आता सत्तालोलुप कोण? हे ज्याचे त्याने ठरवावे....