Thursday, May 7, 2009

अजून किती सहन करणार काँग्रेसला?

एक मोठे काम सांगू का भाजपाने केलेले?

गरिबांचे आशिर्वाद तरी मिळवले होते त्यांनी
जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवले होते भाजपाच्या सरकारने.
त्यासाठी काय काय उठाठेवी केल्या ते त्यांचे त्यांना माहीत...

पण गरिबांना ५ वर्षे एकाच दराने स्वस्त अन्न धान्य उपलब्ध करुन दिले होते...
गरिबांच्या पोटाचा विचार किमान या सरकार ने केला तरी होता...


काँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे
वीज
पाणी
पेट्रोल
२०-२२ रुपयाला मिळणारा तांदूळ ४०-६० रुपयांना मिळतोय
डाळींचेही तेच
साखर
दूध
गहू
बाजरी

सर्व्हिस टॅक्स वाढवला
व्हॅट सुरु केला

सगळ्यां जीवनावश्यक वस्तूंचे भाव तुम्ही पहा.
तुमचे तुम्हालाच कळेल सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागते आहे ते....
गरिबीरेषेखाली जगणारे व मध्यमवर्गीय या वर्गात मोडणारे जे आहेत ते सर्व देशाच्या बहुसंख्य लोकांमधे येतात. ९०% पेक्षा जास्त

तुम्हीच बोला ... सर्वसामान्य माणसाने काय करावे?

सामान्य माणसांना अणुकरार.... विदेश दौरे या गोष्टी नाही कळत हो.... त्याला फक्त पोटाला बसणारा चिमटा कळतो....
मन मारणे कळते....

काँग्रेसने इमानेइतबारे सर्वसामान्यांसाठी काम करायचे ठरवले असते तर खरेच ५-१० वर्षे पुरेशी आहेत देशाचा कायापालट करायला.
पण सर्वात जास्त स्विस बँकेत बॅलन्स फुगवण्यात काँग्रेसी नेते आघाडीवर आहेत हे सत्य नाकारता येणार नाही... यामुळेच तर सध्याचे सरकार काळया पैशावर मौन साधून आहे आणि कोणतीही कार्यवाही करत नाहीये. चोरच कसा सांगेन ही आपली चोरी आहे म्हणून :)
आडवाणींनी राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित केला असे मान्य केले तरी सत्य नाकारता येत नाही....

अरे लेको आपल्याच कष्टाचे पैसे विदेशात पडले आहेत आणि आपण त्याच चोरांना योग्य उमेदवार म्हणून निवडून देतो याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे....

एकालाच संधी किती वर्षे देणार? झाली की ५० वर्षे... दुसर्‍या पक्षांना संधी नाही मिळाली तर त्यांना अनुभव कधी येणार?

आपण सर्व मतदार लाचारीने एकच पर्याय कायम निवडत आलेलो आहोत... दुसरी अनुभवाची फळी तयार करणे हे सुज्ञ मतदार म्हणून आपले कर्तव्य नाही काय?
दिसला पंजा की मार शिक्का... विचार न करता???
पहा विचार करुन माझे विचार पटले तर....

जय हिंद जय महाराष्ट्र
- सागर
अवांतरः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाका अशी स्वतः गांधीजींची इच्छा होती म्हणे... पण नेहरु प्रभृतींनी विरोध केला आणि सत्तेत सहभागी होण्याच्या लालसेने काँग्रेस जिवंत ठेवली... आता सत्तालोलुप कोण? हे ज्याचे त्याने ठरवावे....

No comments: