Tuesday, September 9, 2008

राज ठाकरे यांची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) आणि त्याचा परिणाम

(सोम , 0८/09/2008 )
आयबीएन-लोकमत वर बातमी पाहीली. राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांचा एकही चित्रपट माफी मागेपर्यंत रिलिज होऊ न देण्याची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) केली आहे. कुत्सितपणे हसून मराठी भाषेची खिल्ली उडविणार्‍या जया बच्चन यांनी यु.पी. मधे जाऊन रहावे एवढे यु.पी. प्रेम ओतू चालले असेल तर..मुंबईने जे दिले ते यु.पी. देईन का ? मी हिंदी या राष्ट्रभाषेचा सन्मानच करतो... किंबहुना भारतात राहणार्‍या प्रत्येकाला राष्ट्रभाषा ही बोलता यायलाच हवी या मताचा मी आहे. आता मी इकडे कर्नाटकात गेली चार वर्षे रहात आहे. मी स्वतः कधी कन्नड भाषेची खिल्ली उडवणार नाही. मला स्थानिक भाषा येत नाही म्हणून मी असे कधीच म्हणणार नाही की मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठीच बोलणार...इकडे दक्षिणेत असे चालणारच नाही. जया बाईंना हे माहीत नाही काय? मग मुंबईत राहून मराठी भाषेची कुत्सितपणे हसून चेष्टा करायची काय गरज होती त्यांना? हा मराठी माणसांच्या हृदयाचा मोठेपणा आहे की ते हिंदी बोलणार्‍याशी हिंदीतून बोलतात आणि मदत करतात. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक , आंध्र इकडे हिंदी शिकण्याची तसदीदेखील कोणी घेत नाही....
आपण तर राज ठाकरेंबरोबर आहोत... असा दणका दिल्याशिवाय त्या यु.पी. वाल्यांना कळतच नाही...
http://khabar.josh18.com/ येथे हिंदी वाहिन्यांची कारागिरी बघायला मिळेल...

( मंगळ, 09/09/2008 - 11:15).
जया बच्चनने माफी मागितली
आजची सकाळ बातमी घेऊन आली की जया बच्चनने माफी मागितली आहे..... आता हे नेभळट सरकार 'राज ठाकरे' यांच्यावरील बंदी उठवायचे कष्ट घेणार का? माफी जया बच्चन यांनी मागितली आहे , तेव्हा त्यांची चूक त्यांना मान्य आहे. तेव्हा राज ठाकरे योग्य तेच बोलत होते हे सिद्ध झाले आहे. तेव्हा आता बघायचे आपले पोलिस कमिशनर महाशय काय करतात ते.... अर्थात असल्या पक्षपाती कारवायांना 'राज ठाकरे' गणतीत धरत नाही ते वेगेळे...
मराठी माणूस पेटला की कोणालाही झुकवू शकतो हे मात्र यातून सिद्ध झाले... आता कालपर्यंत राज ठाकरे की हिटलरशाही म्हणून जोरात स्वतःची पोळी भाजणारे न्यूज चॅनेल्स आता दुसर्‍या बातम्यांकडे वळतील.... का तर एका हिंदी भाषिकाला माफी मागायला लागली ना....असो...राज ठाकरे यांनी मात्र जयाने सार्वजनिक माफी मागेपर्यंत विरोध कायम ठेवायचे ठरवले आहे. येथे ही बातमी पाहू शकता http://khabar.josh18.com/news/3117/3
जय महाराष्ट्र
-सागर